वरील शीर्षक असणाराच लेख पूर्वी पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी "भारताचा राष्ट्रवाद" या संग्रहात मांडलेला आहे. मनुष्याला सुटे अस्तित्व नसून, तो अनेक परंपरांचा परिणाम असतो. असे या लेखात अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शविले आहे. मला अनेक परंपरांचा परिणाम म्हटला की मॅट्रिक्स सिनेमा आठवतो. त्यात, मॅट्रिक्सचा आरेखक (the Architect) कथानायकाला असे सांगतो की तुझे त्याच्याकडे - आरेखकाकडे जाणे - हे अनेक घटनांच्या बेरजेचा परिणाम आहे. अशा परंपरांकडे तुच्छतेने वा द्वेषाने बघण्याची दृष्टी मार्क्स वा त्याच्या सारख्या जगभराच्या अर्धवट विचारवंतांकडेच, किंवा छद्म-उदारमतवादी लोकांकडे असू शकते. परंपरांनी "नाही रे" वर्गाचे शोषण करणे शक्य होते, हे वादापुरते मानू. परंपरा सतत सुधारत्या राहिल्या आहेत, व परंपरांची बेरीजच अस्तित्वाचे सातत्य टिकवून धरते, हे मार्क्सिस्टांना अथवा त्यांच्या भारतातील ०.००५% संपृक्त भ्रष्ट नकलांना कधी कळलेच नाही असे मला स्पष्टपणे वाटते. पुगंच्या लेखात परंपरा, त्यांचे औचित्य, कालानुरूप बदल करणे इ. अनेक मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे. त्यासाठी हा लेख नाहीच. पु...