Skip to main content

Posts

Nationalism, Humanity and Long term Future - Note 1

आपला राष्ट्रवाद हा मानव्याच्या हितासाठी आहे, हे प्रत्येक राष्ट्राला दाखवून द्यावे लागेल.  असे काही निकष असतील की ज्यांच्या आधारे प्रत्येक राष्ट्राने मानव्याच्या हितासाठी काम केले आहे की नाही याचे मूल्यमापन करता येईल. असे मूल्यमापन करण्याच्या निकषांपैकी प्रत्येक निकषांचे राष्ट्रागणिक महत्त्व बदलेल. प्रत्येक राष्ट्राचा निकषसंच वेगळा तयार होईल. जे आपले निकष इतरांना पटवून देऊ शकतील, त्यांना अधिक महत्त्व येईल. अशा निकषांवर उतरलेली जी राष्ट्रे मानव्याच्या हितासाठी काम करत आहेत, त्या राष्ट्रांची घडण व प्रगती झाली तरच मानव्याची प्रगती होईल हे उघड आहे.  मानव्याचा इतिहास १५००० वर्षांच्या पलीकडे जात नाही. जागतिक रचना कशाबशा लागलेल्या आहेत आणि जग बहुध्रुवीय झालेले आहे अशी आजची स्थिती आहे. ती स्थिती थोडीफार बदलेल, काही राष्ट्रांना स्वत:मध्ये प्रचंड बदल करावे लागतील. काही संस्कृतीही स्वत:ला बदलून घेतील. हे झाले की अशा नवीन व्यवस्थेचे आयुष्य वाढते कसे ठेवायचे हा प्रश्न असेल. सध्याचे तिचे आयुष्य फार तर शंभरेक वर्षांचे आहे. किमान हजार वर्षांचे भवितव्य समोर मांडल्याशिवाय चांगली प्रेरणादायक उद्द...
Recent posts

गीता समजून घेताना - २

गीता समजून घेताना - २  प्रबोधिनीचे काम करताना विविध सहकारी, वरिष्ठ आणि मित्रांशी अनेकानेक विषयांवर चर्चा होत असतात. एकांनी मला नुकतेच फेसबुकवरील एका ताईंचे लेखन पाठवले. त्यांच्या लेखनाबद्दल आदर वाटला. मुद्दे योग्य आहेत असेही वाटले. पण या ब्लॉगचा मूळ मुद्दा तो नाही, म्हणून लिंक कॉमेंटमध्ये ढकलत आहे. त्यांचा मुद्दा " अद्वैत तत्त्वज्ञानच अधिकाधिकांपर्यंत पोचते करणे महत्त्वाचे - कर्मकांडांनी नुकसान होते " अशा स्वरूपाचा आहे. मूळ मुद्दा गैर नाही. तो मान्य करूनही, मला त्याबद्दल काय वाटते आहे ते नोंदवत आहे. गीता समजून घेताना - या प्रवासाचाच तो भाग आहे. म्हणून आधीच्या लेखनाचा आधार घेऊन पुढे जात आहे. आधीचा लेख वाचला तरच हा लेख अधिक समजेल असे काही नाही.  (गीतेवरील पहिला लेख)   ब्लॉग जिथे लिहायला बसलोय, तिथे घरात समोर भिंतीवर एक अतिशय सुंदर परिच्छेद फळ्यावर लिहिलेला आहे. " सर्व प्रकारच्या परस्परविरोधी नि परस्परविसंगत वाटणाऱ्या पंथोपपंथांमध्ये हेच एक तत्त्व मुळाशी गोवलेले आहे की, सर्व सामर्थ्य, सर्व शुद्धता, सर्व वैभव हे आत्म्यामध्ये मूलत:च आहे. रामानुजाचार्यांच्या मताप्रमाणे हा आत्म...

My take on Dhurandhar 2

Spoiler Alert: Key events being discussed from the film. So will be better to watch it first and then come here. Note: Did not think of writing this post in English, but a few friends asked, so here it goes. Dhurandhar-2: A Philosophical Analysis Many people have written extensively about this film from various angles. It has earned both praise and harsh criticism - sometimes well-founded sometimes out of sheer hypocrisy. Memes about “peak detailing” have all made the rounds. Let me bring up one detail that hasn’t received much attention, and then move towards the central point of my take. In one scene, a nurse comes to kill a terrorist — this role is played by Yami Gautam, wife of director Aditya Dhar. The character’s name, visible on her nameplate - but easy to miss, is Shazia Bano — which is also the name of the protagonist in Yami Gautam’s recently made beautiful film Haq . That’s not a coincidence.  The reason to mention this details is connected to the very philosophy of Dhu...

धुरंधर -२ च्या निमित्ताने

SPOILER ALERT  कथानकातील काही घटनांचा थेट उल्लेख आहे, त्यामुळे आधी चित्रपट पाहून मग इथे आलेले चांगले.  धुरंधर -२ पाहिला.  अनेकांनी त्याच्या विविध पैलूंवरती पुष्कळ लिहिले आहे. बरे-वाईट दोन्ही लिहिले आहे. "पीक-डिटेलिंग" वर व्यंगचित्रेही बनवून झाली. सहसा वाचनात न आलेलं एक उदाहरण देऊन मुख्य मुद्द्याकडे जाऊ - एका अतिरेक्याला मारायला एक परिचारिका (नर्स) येते, तिची भूमिका यामी गौतम यांनी म्हणजे आदित्य धर यांच्या पत्नीने केलेली आहे. त्या परिचारिकेचे नाव शझिया बानो ठेवलेले आहे. तिच्या कपड्यांवरील नामपट्टीकडे सहज लक्ष जात नाही म्हणून ते लक्षात येत नाही. शझिया बानो हेच यामी गौतम यांच्या नुकत्याच आलेल्या "हक" या नितांत सुंदर चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आहे.  हा तपशील मांडण्याचे कारण धुरंधरच्या तत्त्वज्ञानाशी जोडलेले आहे असे वाटते. कसे ते हळू हळू पाहात जाऊ. धुरंधर -१ हे मुख्यत: वातावरण निर्मितीसाठीची तयारीच आहे. पाकिस्तानातील विविध गट, त्यांच्यातील लढाया, त्यांच्यातील ईर्ष्या / स्पर्धा, बलुच स्वातंत्र्यलढा याबद्दल पुरेशी पार्श्वभूमी तयार केली नसती तर भाग-२ मधील घटनांचा अ...

शिवचरित्र आणि प्रेरणा

 शिवचरित्र हा माझ्या साऱ्या अस्तित्वाचा सर्वात आतला कठीण - न तुटणारा - गाभा आहे. मी पाचवीत असतानाच आमच्या घरी जुनं राजा शिवछत्रपती मिळालं. दोन दिवसांमध्ये दोन्ही खंड वाचून झाले. कुठेही मार्ग कुंठले, अस्वस्थता आली की शिवचरित्र काढून वाचत बसावे. एकदा २०२४ च्या लोकसभेच्या निकालांनंतर असाच नाशिकवरून पुण्याला येत होतो. मनात अस्वस्थताच होती. जातीय राजकारण आणि धार्मिक राजकारणात हिंदू संघटित होत जाताना क्रमश: काही वेळा उतार येतात. तसा हा एक उतार मानता येईल. अभावितपणे मी गाडी चालवता चालवता काही तरी ऐकायचे म्हणून निनाद बेडेकरांची सलग व्याख्यानं लावली. सलग प्रवासात ३-४ व्याख्यानं ऐकून झाल्यावर मला खूपच आधार मिळाला. छत्रपतींना तर याहून भीषण धर्मांधतेच्या अंध:काराला मागे रेटावं लागलं होतं. आपण अनेक लढाया नंतर जिंकत आलेलो आहोत. अजूनही जिंकण्याच्या स्थितीत जाणार आहोत, हा शिवचरित्रानेच प्रेरणा देण्याचा लख्ख प्रसंग मला आठवतोय. असंख्य ठिकाणी शिवचरित्रातली वाक्ये व प्रसंग उद्धृत करून निर्णय दिलेले मला आठवत आहेत. गेली अनेक वर्षं राजकीय गणिते जुळवण्यासाठी जातीयवाद महाराष्ट्रात फोफावला जातोय. त्याने माझ...