या देशातील विविध नागरिकांना विविध प्रकारचे हेतू असतात. सत्तास्पर्धेसाठी महापुरुषांच्या चारित्र्याचे हनन करणे हा उद्योग हा नवीन नाही. विशेषत: कम्युनिस्टांना हा सोडून कोणताच उद्योग करता येत नसल्याने, अथवा समाजात जाऊन उत्तम प्रबोधन करता येत नसल्याने, त्यासाठी वात्सल्यावर आधारलेल्या संघटना उभारता येत नसल्याने, व अखिल भारतीय एकसंध एकच पक्ष अनेक दशके चालवता येत नसल्याने, ते अभ्यास न करणाऱ्यांना बहकवण्यासाठी अधूनमधून इकडेतिकडे डांबरफेक करतात.
गेल्या काही काळामध्ये सावरकर, टिळक आणि रामदास अशा तिघांचे चारित्र्यहनन करणे हा तुम्ही "विचारवंत" असल्याचा पुरावा मानला जाऊ लागला. त्यामुळे सावरकरांची माफी, टिळकांचा जातिभेद आणि रामदासांचे गुरू नसणे यावर राळ उडवणे हे भूषण मानले जाऊ लागले.
दुसरीकडे या तिघांचे भक्तही तितकेच अविचारी निघू लागले. या तिघांचेही अनन्यसाधारण महत्त्व मोजक्या प्रभावी आणि तेजस्वी शब्दात सांगणे हे अनेक हिंदुत्ववाद्यांना जमत नाही. या तिघांच्याही आयुष्यात अजिबात चुका नाहीत असे नाही.
चिकित्सा करूनही एखाद्या माणसाला वंदनीय मानणे, हा जणू आजच्या काळात गुन्हा झाला आहे.
सावरकर, टिळक, रामदास यांना वंदनीय मानायचे नाही असा अध्यादेश तथाकथित पुरोगाम्यांनी काढलेला असून, या तिघांची अजिबात चिकित्सा करायची नाही असे वातावरण हिंदुत्ववाद्यांमध्ये असते. या उलट गांधी, नेहरू, आंबेडकर, शाहू, फुले, यांची चिकित्सा न करणे हा पुरोगामित्व मिरवण्यासाठी अत्यावश्यक गुण असून, यांना दुर्लक्षित करणे हा तुम्ही हिंदुत्ववादी असण्यासाठी अत्यावश्यक गुण झालेला आहे.
या दोन्ही बाजूंच्या गुणदोषांपासून (बऱ्यापैकी अलिप्त) असलेले नरहर कुरुंदकर यांनी विविध व्यक्तींची रेखाटने करताना अतिशय समतोल पद्धतीने चिकित्सा आणि वंदनीयता जोपासली आहे.
कुरुंदकरांचा सावरकरांवरील लेख मराठी वाचकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असून अमराठी भाषकांसाठी तो इंग्रजीतून उपलब्ध करून द्यावा असे वाटत असल्याने इथे भाषांतर करून देत आहे.
मराठवाड्यातील निजामी वातावरणात मुस्लिम अतिरेकीपणामुळे झालेले अत्याचार कुरुंदकरांनी दुर्लक्षिले नाहीत. त्यामुळे त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाची भीतीने अथवा अज्ञानापोटी अवहेलना केली नाही. ते सावरकरांचे भक्त नसले, तरी सावरकरांचे एक चांगले मूल्यमापन त्यांनी केले आहे, असे वाटल्याने तो लेख सर्वांनी वाचावा असा आग्रह करत आहे.
कुरुंदकरांच्या प्रकाशकीय हक्कांविषयी कोणाला कसे विचारायचे हे माहित नसल्याने परस्पर इंग्रजी लेख देत आहे, संपर्क मिळाल्यास परवानगी मागण्याची इच्छा आहे.
लेखन: नरहर कुरुंदकर, पुस्तक - अन्वय
भाषांतर: वेद गुमास्ते
भाषांतर संपादन: नचिकेत नित्सुरे
लेख इथे मिळेल: इंग्रजी लेख
सध्या कुठल्यातरी एका बाजूचे असलात तर तुम्हाला ओळख असते! याचे कारण 'अभ्यासोनी प्रकटावे' पेक्षा 'टाहो फोडून प्रसिद्ध पावावे' यातच धन्यता वाटणारे अभ्यासक(?) निर्माण होत आहेत त्यामुळे नेमके, विचारपूर्वक, पण धाडसाने लिहिणारे दुर्मीळ होऊ लागलेत....चांगले मांडले आहे.
ReplyDelete