Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

शिवचरित्र आणि प्रेरणा

 शिवचरित्र हा माझ्या साऱ्या अस्तित्वाचा सर्वात आतला कठीण - न तुटणारा - गाभा आहे. मी पाचवीत असतानाच आमच्या घरी जुनं राजा शिवछत्रपती मिळालं. दोन दिवसांमध्ये दोन्ही खंड वाचून झाले. कुठेही मार्ग कुंठले, अस्वस्थता आली की शिवचरित्र काढून वाचत बसावे. एकदा २०२४ च्या लोकसभेच्या निकालांनंतर असाच नाशिकवरून पुण्याला येत होतो. मनात अस्वस्थताच होती. एकगठ्ठा मतदान करून विकासाची बाजू धर्मापेक्षा कमी महत्त्वाची मानणे असा जुनाच धडा मुसलमानांनी त्या लोकसभेत पुन्हा मालेगावसारख्या दोन-तीन ठिकाणी घालून दाखवलेला होता, हे निकालांच्या विश्लेषणानंतर पुरेसं स्पष्ट होतं. अभावितपणे मी गाडी चालवता चालवता काही तरी ऐकायचे म्हणून निनाद बेडेकरांची सलग व्याख्यानं लावली. सलग प्रवासात ३-४ व्याख्यानं ऐकून झाल्यावर मला खूपच आधार मिळाला. छत्रपतींना तर याहून भीषण इस्लामी धर्मांधतेच्या अंध:काराला मागे रेटावं लागलं होतं. आपण अनेक लढाया नंतर जिंकत आलेलो आहोत. अजूनही जिंकण्याच्या स्थितीत जाणार आहोत, हा शिवचरित्रानेच प्रेरणा देण्याचा लख्ख प्रसंग मला आठवतोय. असंख्य ठिकाणी शिवचरित्रातली वाक्ये व प्रसंग उद्धृत करून निर्णय दिलेले ...