*दीपावलीच्या मन:पूर्वक खूप खूप शुभेच्छा!* 🛕🎇🎆🎇🎆🛕 तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ही दिवाळी आणि येणारे वर्ष सुखसमाधानाचे व भरभराटीचे जावो, तुमचे सर्व संकल्प व मनोरथ पूर्ण करण्याचे बळ तुम्हाला प्राप्त होवो, ही ईशचरणी प्रार्थना!! -- नचिकेत नित्सुरे व परिवार 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🙏🏽🙏🏽🙏🏽 _(वेळ होईल तेव्हा सावकाशीने वाचण्यासाठी)_ गेली अनेक वर्षे दीपावलीनिमित्त थोडेसे विचार पाठवत असतो - या ही वर्षी लिहित आहे: मागच्या काही वर्षांमध्ये श्री म्हणजेच संपत्ती निर्माण व त्यासाठी उत्तमतेचा ध्यास कसा महत्त्वाचा आहे असे लिहित होतो. परमेश्वराची साधना म्हणजेच उत्तमतेची साधना कशी असेही पूर्वी कुठे कुठे लिहिले आहे. परमेश्वराच्या साधनेसाठी स्वत:ला योग्य बनवायचे तर मग आपल्यातील अनेक गुण-दोष दूर झाले पाहिजेत. गेली तीन वर्षे युवक वयोगटासाठी वीरव्रत आणि त्याहून मोठ्या गटासाठी विकासव्रत अशा दोन संस्कारांचा विचार आम्ही काही जण करत आहोत. त्याचा अभ्यास चालू आहे. आपापले दोष हुडका, ते जाणीवपूर्वक दूर करण्यासाठी काही अनुभव घ्या, संकल्प करा आणि ते पाळल्यामुळे जो बदल होईल, तो तपासण्याकरता आव्हाने...